Home Accident News अहमदनगर: दुचाकी झाडावर आदळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

अहमदनगर: दुचाकी झाडावर आदळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Ahmednagar Accident:  दुचाकीवरून विद्यार्थी प्रवास करीत असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाडावर जाऊन आदळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना.

Two students died after their bike hit a tree Accident

अहमदनगर : दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शेंडी बायपास शिवारातील वेदांत हॉटेलजवळ गुरूवारी पहाटे हा अपघात झाला आहे.

अजय मनोज गोमारे (वय 25 रा. आदर्श कॉलनी, लातूर) व आशिष पवन सेठी (वय 20 रा. शिर्डी) असे अपघातात मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, अजय मनोज गोमारे व आशिष पवन सेठी हे दोघे विळद (ता. नगर) येथील डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते. ते गुरूवारी पहाटे त्यांच्याकडील स्पोर्ट दुचाकीवरून प्रवास करत होते.

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. अजय व आशिष यांना उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यानउपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two students died after their bike hit a tree Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here