पंचनाम्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित
Ahmednagar, Rahuri News: अतिवृष्टीच्या पंचनाम्यासाठी कामगार तलाठ्यांनी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केल्याची आरोप काही युवा कार्यकर्त्यांनी आमदारांकडे केल्याने चौकशी करून दोन कामगार तलाठ्यांना निलंबित (Suspende) करण्याचे आदेश काढले.
राहुरी: अतिवृष्टीच्या पंचनाम्यासाठी शेतकर्यांकडून पैशाची मागणी केल्याप्रकरणी येथील युवा कार्यकर्त्यांनी महसूल विभाग व आ. लहु कानडे यांच्याकडे तक्रार केल्या प्रकरणी या तक्रारीची खातेनिहाय चौकशी करून येथील कामगार तलाठी अरुण हिवाळे तसेच राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील कामगार तलाठी सुवर्णा शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश प्रांताधिकारी अनिल पवार यांनी काढले आहेत
परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या खरिपाच्या पिकांचे नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले होते. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असताना शेतकर्यांकडून शंभर रुपये घेतले जात आसल्याची लेखी तक्रार प्रहार जनशक्ति पक्षाचे रघुनाथ शिंदे व महेंद्र संत यांनी आ. लहु कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत आ. कानडे यांनी प्रांताधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते.
याप्रकरणी चौकशीस विलंब होत असल्याने आ. कानडे यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार आसल्याचे नुकतेच सांगितले होते. प्रांताधिकारी आनिल पवार यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत तहसिलदार प्रशांत पाटील यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार टाकळीभानचे मंडळाधिकारी यांनी चौकशी करुन काल बुधवारी अहवाल सादर केला होता. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी तलाठी हिवाळे यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत. . दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नेवासा तालुक्यातील कृषी सहाय्यक, ग्रामसेविकेस अशाच प्रकरणावरून निलंबित करण्यात आलेले आहे.
Web Title: Two talathis suspended for demanding money for Panchnama
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App