संगमनेर: कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
Breaking News | Sangamner: कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडून येथील पोलिसांनी २ गायीसह वासरांना जीवदान.
संगमनेर : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडून येथील पोलिसांनी २ गायीसह वासरांना जीवदान दिले. येथील पोलिसांनी रविवारी रात्री ही कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जात आहे. कत्तलीसाठी वेगवेगळ्या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. पोलिसांनी पहिली कारवाई रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरातील मदिना नगर परिसरात
केली. या ठिकाणी एका वाहनांमधून वासरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. पोलिसांनी २ हजार रुपये किंमतीचे वासरे व चारचाकी वाहन जप्त केले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राझीक मुभीर शहा (रा. अपना नगर, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी कारवाई शहरातील मधील नगर परिसरातच रात्री साडेदहा वाजता केली. या ठिकाणी ४० हजार रुपये किंमतीच्या दोन गाया, ५ हजाराचे वासरू व ५ लाखांची महिंद्रा बोलेरो गाडी जप्त केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सलमान फारुख मणियार (रा. मोमिनपूरा, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Two vehicles transporting animals for slaughter were seized
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study