टँकरच्या धडकेत संगमनेर येथील दुचाकीस्वराचा मृत्यू
Ahilyanagar Accident: टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना.
कोपरगाव: टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी नगर- मनमाड रस्त्यावरील आत्मा मालिक हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी अज्ञात टैंकर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील ऊसतोड मजुर बाळू रतन बर्डे व त्याचा मित्र ताराचंद बाळू गायके (रा. परसोडा, ता. वैजापूर) हे दोघे २६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमएच १७ एबी ९३१८ क्रमांकाच्या दुचाकीवरून कोपरगावहून शिर्डीकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या जी.जे. ३९ टी ९९३८ क्रमांकाच्या टँकरने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत ताराचंद बाळू गायके (वय २८) हा जागीच ठार झाला तर बाळू बर्डे हा जखमी झाला. त्याच्यावर आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दवाखान्यात दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी अज्ञात टँकर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल के. ए. जाधव हे करीत आहेत.
Web Title: Two wheeler dies in collision with tanker in Sangamner