संगमनेर: पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वायरमन ठार
Breaking News | Sangamner: पिक अप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना.
संगमनेर: तालुक्याच्या पठार भागावरील पुणे नाशिक महामार्गावरील घारगाव शिवारात पिक अप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक ३० जानेवारी रोजी दुपारी घडली. घारगाव शिवारातील पुणे नाशिक महामार्गावरील हॉटेल लक्ष्मी ढाब्यासमोर हा अपघात झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालिंदर पोपट मते रा. भोजदरी ता. संगमनेर हे त्यांचे दुचाकी क्रमांक एम.एच. १७ ए .एस. ३८ ८१ हिच्यावरून महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेली पिकअप क्रमांक जी जे ०६ बी.व्ही.२९७९ हिने मते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली. मते यांना खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी संगमनेर येथे पाठविण्यात आले. परंतु या दरम्यान त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
मते हे घारगाव परिसरात खासगी विद्युत दुरुस्ती करण्याचे काम करत होते. त्यामुळे ते बाळू मते वायरमन नावाने ओळखले जात होते. त्यांच्या या अपघाती निधनाने पठार भागात शोककळा पसरली आहे.
Web Title: Two-wheeler wireman killed in collision with pickup vehicle
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study