उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Uddhav Thackeray: धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटलं.
मुंबई: शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली असून त्यांना विविध तपासण्या करण्यासाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. ते आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे शिवसैनिक चिंतेत आहत. धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. त्यांची अँजिओग्राफी देखील केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याआधी त्यांची अँजिओप्लास्टी देखील झाली आहे. त्यामुळे डॉक्टर हार्ट ब्लॉकेजशी संबधित व हृदयाशी संबंधित इतर तपासण्या करत आहेत. अँजियोग्राफीमद्वारे हार्ट ब्लॉकेज तपासता येतात. अँजिओग्राफीत हार्ट ब्लॉकेज आढळले तर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी व इतर उपचार केले जाऊ शकतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अतिशय आक्रमकपणे फिरताना आणि प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. त्यातच त्यांना मेडिकल रुटीन चेकअप करत असताना ब्लॉकेज आढलून आल्यामुळे डॉक्टरांनी अॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला. त्यानुसार अॅन्जिओप्लास्टी झाली आहे. तसेच थोड्याच वेळाने उद्धव ठाकरे यांना एचएन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार असल्याची देखील माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
Web Title: Uddhav Thackeray’s condition deteriorated, admitted to hospital
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study