मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची शिवसेना ‘या’ निवडणुका स्वबळावर लढणार
Mahapalika Elections: मुंबईपासून-नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.
मुंबई: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच शिवसेनेने मोठी घोषणा केली आहे. मुंबईपासून-नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना महापालिकेच्या निवडणुकांबद्दल मोठी घोषणा केली आहे. आता शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.
या घोषणेमुळं महाविकास आघाडीत फुट पडली का? असा सवाल केला जात आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, झेडपीमध्ये शिवसेना यूबीटी स्वबळावर लढणार असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसं सांगितलं आहे, असंही राऊत म्हणाले.
Web Title: Uddhav Thackeray’s Shiv Sena will fight these elections on its own
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News