Home Maharashtra News उद्यनराजेंना लागले ‘पुष्पा’चे वेड; हटके स्टाईलने उडवली कॉलर

उद्यनराजेंना लागले ‘पुष्पा’चे वेड; हटके स्टाईलने उडवली कॉलर

Udyan Raje got mad about 'Pushpa'; blown collar in his style

सातारा : महाराष्ट्रातील असंख्य वर्ग ज्यांना मानतो असे उदयनराजे भोसले हे आता पुष्पाच्या प्रेमात पडले आहेत. बॉक्स ऑफिसवर धुसघूस घालणाऱ्या पुष्प या सिनेमातील पुष्पराजच्या स्टईलवर ते (Udayanraje Bhosale) फिदा झाले आहेत. याचाच प्रत्यय आज सातारकरांना पाहायला मिळाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पुष्पा सिनेमातील ‘पुष्पा फ्लावर नही फायर हे’ हा डायलॉग आता देशभरात लोकप्रिय झाला आहे. उदयनराजे म्हटलं की त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल सर्वांनाच परिचित आहे. अलीकडे त्यांनी पुष्पातील गाण्यावर हटके स्टाईलनं कॉलर उडवली आहे. इतकच नाही तर लुंगी घालून त्यांनी साताऱ्यात फेरफेटका देखील मारला आहे.

उदयनराजे नेहमीच आपल्या हटके लूक आणि नवनव्या स्टाईलमुळे चर्चेत राहत असतात. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल महाराष्ट्रात अगोदरच प्रसिद्ध आहे. मात्र आता त्यांनी पुष्पा सिनेमाच्या गाण्यावर हटके अंदाजात साताऱ्यात केलेल्या नव्या स्टाईलची महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.

Web Title : Udyan Raje got mad about ‘Pushpa’; blown collar in his style

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here