Home Maharashtra News Accident: टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू

Accident: टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू

Uncle and nephew died on the spot after the tipper and the two-wheeler Accident

बुलडाणा | Buldhana: भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत अपघात (Accident) झाला. या अपघातात  काका-पुतण्याचा जागीच मृत्यू असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जलंब ते माटरगाव महामार्गावर बुधवारी (४ मे) रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेने देशमुख कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.  

शाम भीमराव देशमुख आणि पार्थ गंभीरराव देशमुख अशी अपघातात मयत झालेल्या काका पुतण्याची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,  भीमराव देशमुख हे आपला पुतण्या पार्थसह गावातील व्यक्ती कुणाल देशमुख यांच्यासह दुचाकीने बुधवारी रात्री गावाच्या दिशेने येत होते. दरम्यान, जलंब ते मारटगाव महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने देशमुख यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, देशमुख हे टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.

तर, पार्थ आणि कुणाल देशमुख या अपघातात गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने खामगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे उपचार सुरू असताना पार्थचीही प्राणज्योत मावळली. मृत काका पुतण्यांचे आज गुरूवारी शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जलंब पोलिसांत टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Web Title: Uncle and nephew died on the spot after the tipper and the two-wheeler Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here