संगमनेर: विहिरीत पाय घसरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Breaking News | Sangamner: महिलेचा विहिरीत पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर | साकुर: संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील बिरेवाडी येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नंदाबाई लालू ढेंबरे यांचा विहिरीत पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.
बिरेवाडी येथील दुधाने मळ्यामध्ये लालू ढेंबरे हे सहकुटुंब राहत आहे. ते शेती व्यवसाय करताय. मंगळवारी दुपारी लालू ढेंबरे यांच्या पत्नी नंदाबाई जवळपास असलेल्या विहिरीजवळ काहीतरी काम करीत होत्या. मात्र अचानक पाय घसरून त्या विहिरीत पडल्या. बराच वेळ झाला तरी नंदाबाई काही येईना म्हणून कुटुंबीय शोधाशोध करीत होते. अखेर नंदाबाई विहिरीत पडल्याचे समोर आले. त्यांना विहिरीतून वर काढण्यात आले मात्र तोपर्यंत मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह संगमनेर येथे शवविचेदन करण्यासाठी हलविण्यात आला. त्यांच्या दुर्दवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
Web Title: Unfortunate death of a woman after her foot slipped in a well
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study