Home भारत Union budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्प होणार आज सादर

Union budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्प होणार आज सादर

Union budget 2022

Union budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) आज देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना संकट ओसरत असताना कोरोनामुक्तीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करतील. मंदीतून सावरणा-या देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पातून विविध घोषणा होण्याची शक्यता आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळू शकतो अशी चर्चा आहे.

पुढील वर्षात देशाचा जीडीपी (GDP) ८ ते ८.५ टक्के असेल असा अंदाज काल मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालात आहे. पायाभूत सुविधांसाठी अर्थमंत्री या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करतील अशी शक्यता आहे. मोदी सरकारच्या दहाव्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला बुस्टर डोसची अर्थमंत्र्यांची तयारी दिसू शकते. कोरोनामुक्तीच्या बजेटचं सादरीकरण सकाळी ११ नंतर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे या नव्या बजेटमध्ये काय असणार आहे? व त्यातून काही बदल होणार आहेत का? याकडे देशवासियांचेही डोळे लागलेले आहेत.

Web Title : Union budget 2022 Live: Union budget to be presented today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here