Home Maharashtra News Union Budget 2022 : मोदी सरकारचा Digital Currency बाबत नवा निर्णय

Union Budget 2022 : मोदी सरकारचा Digital Currency बाबत नवा निर्णय

Union Budget 2022

Union Budget 2022 : केंद्र सरकारने २०२२ च्या अर्थसंकल्पामध्ये डिजीटल करन्सीसंदर्भात एक मोठी आणि वेगळी घोषणा केली आहे. आगामी आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजीटल करन्सी जारी करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. येत्या आर्थिक वर्षातच ही करन्सी जारी केली जाणार आहे.

अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज डिजीटल रुपीची घोषणा केली. हे डिजिटल चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) माध्यमातून जारी केलं जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चात आणि सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. डिजीटल रुपी हे डिजिटल चलन ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरबीआयकडून येत्या आर्थिक वर्षादरम्यान जारी केलं जाणार आहे. या नव्या बदलामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला.

डिजीटल माध्यमातील संपत्तीवर आता ३० टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच या ऑनलाइन व्यवहारांवर देखील एक टक्का TDS आकारला जातोय. संपादनाचा खर्च वगळून अशा उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही खर्चाच्या किंवा भत्त्याच्या संदर्भात कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

Web Title : Union Budget 2022: Modi government’s new decision on digital currency

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here