Home भारत Union Budget 2022 Live : आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी दिलासादायक काही नाही

Union Budget 2022 Live : आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी दिलासादायक काही नाही

Union Budget 2022

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांबाबत उल्लेख केला आहे. महत्वाचं म्हणजे आरबीआयचं डिजिटल चलन येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आलं असल्याचं देखील जाहीर केलं आहे.

निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना डिजिटल अर्थसंकल्प मांडत आहेत. गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता. दरम्यान अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये देखील उत्साह पहायला मिळत आहे.

सेन्सेक्समध्ये सकाळी ५०० अंकाची वाढ पहायला मिळाली होती. तर दुसरीकडे सोमवारीदेखील चांगली वाढ पहायला मिळाली. आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात आर्थिक विकास दर आणि अनुकूल जागतिक संकेतांच्या आधारे सेन्सेक्समध्ये ८१३ अंकांची वाढ होऊन ५८ हजारांच्या पुढे जाईल अशी शक्यता व्यक्त केली होती.

Web Title : Union Budget 2022: There is still no good consolation for the general public

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here