संगमनेर: अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन ऐवज लांबवला
Breaking News | Sangamner: घरफोडी करुन मिनी गंठण आणि बावीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
संगमनेर: शहरातील रहाणेमळा येथील जयभद्रा वसाहतीत अज्ञात चोरट्याने शुक्रवारी (दि. २७) घरफोडी करुन मिनी गंठण आणि बावीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की जयभद्रा वसाहतीतील नवनाथ पंढरीनाथ सरोदे यांच्या बंद घराचे कुलूप कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात असलेल्या सामानाची उचकापाच करुन वीस हजार रुपयांचे मिनी गंठण आणि बावीस हजार रुपयांची रक्कम असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी नवनाथ सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. महाले हे करत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Web Title: unknown thief broke into the house and delayed the exchange
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study