संगमनेर: अज्ञात चोरट्याने रस्त्यावर जाळली मोटारसायकल
Sangamner Crime: चोरट्याने मोटरसायकलची चोरी करून ती रस्त्यावरच जाळून टाकल्याची घटना.
संगमनेर : अज्ञात चोरट्याने मोटरसायकलची चोरी करून ती रस्त्यावरच जाळून टाकल्याची घटना तालुक्यातील पठार भागातील जवळे बाळेश्वर परिसरातील महालवाडी येथे नुकतीच घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अज्ञात चोरट्याने बुधवारी (दि. २६) रात्रीच्या सुमारास भागवत तुकाराम कोठवळ यांची मोटरसायकल चोरली. त्यानंतर त्याने ही मोटरसायकल रस्त्यावरच जाळून टाकली. घारगाव पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मागील काही दिवसांपासून पठार भागात मोटरसायकल चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीच्या सुमारास घराबाहेर लावलेल्या मोटरसायकलमधून पेट्रोल चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी नागरीकांतून केली जात आहे.
Web Title: unknown thief burnt a motorcycle on the road
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App