अहमदनगर: अल्पवयीन मुलासोबत केले अनैसर्गिक कृत्य
Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलासोबत केलेल्या अनैसर्गिक कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. ते व्हायरल करण्याची धमकी देत 40 हजार रूपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.
अहमदनगर: अल्पवयीन मुलासोबत केलेल्या अनैसर्गिक कृत्याचे (Unnatural act) मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. ते व्हायरल करण्याची धमकी देत 40 हजार रूपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी रविवारी (2 जून) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनैसर्गिक कृत्य करून चित्रिकरण करणार्या मुलाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलगा नगर शहरात राहत असून शहरातीलच एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या आरोपी मुलासोबत त्याची ओळख आहे. 1 ऑक्टोबर 2023 रोजी ते दोघे सावेडीतील एका मित्राच्या दुकानात गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपी मुलगा फिर्यादीला म्हणाला, ‘चल आपण माझ्या घरी जाऊन येवू’, तेव्हा फिर्यादी त्याच्यासोबत गेला असता त्याचा दारू पिल्याचा वास येत होता. ते दोघे रात्री 11 वाजता घरी गेले. घरातील हॉलमधील सोफ्यावर गप्पा मारत असताना आरोपी मुलगा फिर्यादीच्या जवळ आला व त्याने अनैसर्गिक कृत्य केले त्यावेळी त्याच्या हातात मोबाईल होता. त्याचा हा प्रकार पाहून फिर्यादी मुलाने त्याला ढकलून दिले व तो घरी गेला.
दरम्यान 15 दिवसांनंतर फिर्यादी मुलगा कॉलेजला गेला असता आरोपी मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये अनैसर्गिक कृत्य केल्याचे चित्रीकरण दाखविले. कोणाला काही सांगितले तर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. चित्रीकरण व्हायरल न करण्यासाठी 40 हजारांची मागणी केली. फिर्यादीने त्याला त्यानंतर तीन दिवसाने 40 हजार रुपये दिले. दरम्यान त्यानंतर देखील आरोपी मुलगा फिर्यादीला धमकी देत असल्याने त्यांनी सदरचा प्रकार त्यांच्या काकाला सांगितला व 2 जून रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Unnatural acts with a minor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study