Home महाराष्ट्र राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, या’ भागात पावसाची शक्यता

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, या’ भागात पावसाची शक्यता

Weather Update: राज्यात जोरदार थंडीची लाट पाहायला मिळत आहे, पुन्हा एकदा  राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता. (Rain Alert).

Unseasonal rain crisis on the state once again, chances of rain in this area

पुणे: राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देशासह राज्यात जोरदार थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्रातही थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला असताना राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात येत्या काही दिवसात थंडीचा जोर ओसणार असून पावसाची शक्यता आहे.

उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरत आहेत. मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने  वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसात मुंबई, ठाण्यातही तापमानात मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबईमध्ये 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

विदर्भात येत्या काही दिवसात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नाशिक शहरासह  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड घट झाली आहे. यामुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत. सकाळी हाडं गोठवणारी थंडी तर दुपारी कडक उन्हाचा चटका नाशिककरांना बसत आहे. लासलगावसह  निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.

Web Title: Unseasonal rain crisis on the state once again, chances of rain in this area

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here