Home संगमनेर संगमनेरात अवकाळी पावसाची हजेरी

संगमनेरात अवकाळी पावसाची हजेरी

Breaking News | Sangamner: संगमनेर शहर व परिसरात रात्री ८ वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस.

Unseasonal rain in Sangamner

संगमनेर: संगमनेर शहर व परिसरात मंगळवारी (दि. १५) रोजी रात्री ८ वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. यामुळे वतावरणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

गेल्या पंधरा दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सकाळी १० वाजताच उन्हाचा तडाका बसत होता. यामुळे घामाने नागरिक बेजार झाले होते. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संगमनेर शहर व तालुक्यातही पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. काल मोठ्या प्रमाणावर उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना रात्री झालेल्या अवकाळी पावसाने काहीसा दिलासा मिळाला. रात्री वारा व पाऊस सुरु झाला. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सध्या एप्रिलतच उन्हाच्या कडाक्याने मागील अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडला. यंदाचा उन्हाळा अधिकच त्रासदायक असल्याने नागरिक दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळत आहे. उन्हापासून बचावासाठी थंड पेयांचा आस्वाद घेतला जात आहे. मात्र काल रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली शहरासह तालुक्यातील काही भागात पाऊस झाला. अर्धा तास पावसाने हजेरी लावली यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने नागरिक सुखावले.

पावसाला रात्री सुरूवात होताच अनेक भागातील विज पुरवठा खंडीत झाला. अगोदरच उन्हाने त्रस्त नागरिकांना विजेची उपकरणे वापरण्यासाठी विज आवश्यक आहे. लोडशेडिंग नसतानाही विज सातत्याने जाते, यातच काल पावसाचे निमित्त झाल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Unseasonal rain in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here