संगमनेर: थोरातांच्या यशोधन कार्यालयावर वंचितचा मोर्चा मात्र….
Breaking News | Sangamner: संगमनेर येथे शासकीय विश्रामगृहासमोर मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. थोरातांच्या कार्यालयावर जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांना रोखले घोषणाबाजी : वंचित आघाडीचे आंदोलन.
संगमनेर : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शनिवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरातील यशोधन जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा काढला, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे जुन्या महामार्गावर काही अंतरावर रोखले. मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, संगमनेर तालुकाध्यक्ष संदीप मोकळ, शहराध्यक्ष अजीज व्होरा यांसह अनिल जाधव, संजय भालेराव, रवी परार, पोपट सरोदे, नितीन बनसोडे, वैभव मोकळ, बाबासाहेब खरात, चंद्रकांत त्रिभुवन, संतोष चोळके, संगीता मिसाळ, संगिता जमदाडे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सह्याद्री शाळेपासून पुढे काही अंतरावर मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी रोखत ताब्यात घेतले. त्यांना सरकारी वाहनात बसवून शहर पोलिस ठाण्यात आणून सोडून देण्यात आले.
दरम्यान थोरात यांनी सोशल मीडियावर दिले उत्तर राहुल गांधी आरक्षण बंद करणार असे कधीही बोललेले नाहीत. त्यांचे अर्धवट वक्तव्य व्हायरल करत काही लोक अफवा पसरवत आहेत ही बाब थोरात यांनी सोशल मीडियावर गत आठवड्यात स्पष्ट केली आहे.
Web Title: Vanchit’s march on the Yashodhan Office of Thorat
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study