विवस्त्र अवस्थेतील महिलेचे व्हिडियो चित्रण, एकावर गुन्हा दाखल
Breaking News | Panvel Crime: बाथरुममध्ये आंघोळ करीत असणाऱ्या एका महिलेचे चित्रण करणाऱ्या तरुणाविरोधात पनवेल पोली ठाण्यात गुन्हा दाखल.
पनवेल: बाथरुममध्ये आंघोळ करीत असणाऱ्या एका महिलेचे चित्रण करणाऱ्या तरुणाविरोधात पनवेल पोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डींगच्या डकच्या पॅसेजमधून वर चढून बाथरुमच्या खिडकीमधून स्वतःच्या मोबाईलमधून सदर तरुणाने महिलेच्या नकळत तिचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ चित्रीत केला.
तालुक्यातील कोंडले गाव येथील एकदंत संकुल को. ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये ही खळबळजनक घटना घडली. एका 20 वर्षीय तरुणाने त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा बाथरुममध्ये आंघोळ करीत असतानाच व्हिडीओ चित्रीत केला. याबाबत महिलेने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Video footage of naked woman, case registered against one
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study