पत्नीच्या अनैतिक संबंधाचा व्हिडीओ नातलगांत व्हायरल, पतीविरोधात गुन्हा
Breaking News | Nashik Crime: पत्नीच्या अनैतिक संबंधाचा व्हिडीओ पतीने पाहताच त्याने तो नातलगांत व्हायरल केल्याने पत्नीने पतीविरोधात म्हसरुळ पोलिसांत फिर्याद दाखल.
नाशिक: पत्नीच्या अनैतिक संबंधाचा व्हिडीओ पतीने पाहताच त्याने तो नातलगांत व्हायरल केल्याने पत्नीने पतीविरोधात म्हसरुळ पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार पतीसह सासरे व दिरा विरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, पतीने हा व्हिडीओ स्वत:च्या वडिल, भावासह पत्नीच्या भावास, भावजई व मुलाला पाठवला. तसेच तो इतर नातलगांना पाठवेल अशी धमकी दिली. त्यानुसार विनयभंगासह आयटी कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे.
दिंडोरी रोडवरील सावरकर उद्यानाजवळील परिसरात राहणाऱ्या दाम्पत्यांमध्ये हा वाद झाला आहे. पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीने २९ डिसेंबरला सकाळी पत्नीचा मोबाइल तपासला. त्यात पीडितेचा तिच्या मित्रासोबत झालेल्या शरीरसंबंधाचा व्हिडीओ होता. तो व्हिडीओ पतीने व्हॉट्सअपवरून स्वत:च्या मोबाइलमध्ये फाॅरवर्ड करुन घेतला.
त्यानंतर हा व्हिडीओ पतीने) त्याचे वडील व भावास तसेच पत्नीच्या भावास, भावजयी व मुलाला व्हॉट्सअपवरून पाठवला. त्यानंतर कुटूंबात खळबळ उडाली.तर हा व्हिडीओ इतर नातलगांना पाठवण्याची धमकीही संशयितांनी दिली. त्यामुळे पत्नीने पतीसह सासरे व दिराविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दाम्पत्य ४५ ते ५० वयोगटातील आहे. पती बेरोजगार असल्याचे समजते तर पत्नी नोकरी करते. पतीने पत्नीचा मोबाइल तपासत व्हिडीओ स्वत:कडे घेत व्हायरल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल डहाके हे तपास करीत आहेत.
Web Title: Video of wife’s immoral relationship goes viral
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News