Home पुणे महिलेचा काढला व्हिडियो, धमकी देत केली शरीरसुखाची मागणी अन मग….

महिलेचा काढला व्हिडियो, धमकी देत केली शरीरसुखाची मागणी अन मग….

Breaking News | Pune Crime: अंघोळ करत असतानाचा महिलेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो समाज माध्यमांवर व्हायरल करत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तरुणाला वानवडी पोलिसांनी नाशिकमधून अटक.

video was taken of the woman, threatening and demanding sexual pleasure

पुणेः अंघोळ करत असतानाचा महिलेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो समाज माध्यमांवर व्हायरल करत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तरुणाला वानवडी पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. कृष्णा शिंदे (वय 20) असे त्या तरुणाचे नाव आहे. महिलेने वानवडी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, लग्नापूर्वी तक्रारदार महिला नाशिकमध्ये राहायला होत्या. त्या वेळी पत्राशेडमध्ये अंघोळ करत असताना आरोपी कृष्णाने त्या महिलेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

त्यानंतर महिलेचे लग्न झाल्यानंतर ती वानवडीत राहायला आली. संबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करून तिची बदनामी केली. याची माहिती महिलेला समजल्यानंतर तिने आरोपीकडे विचारणा केली. त्या वेळी त्याने व्हिडीओ डिलिट करण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी किंवा 30 हजार रोकड देण्याची मागणी केली. याप्रकरणी महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस अंमलदार अमोल पिलाने, अतुल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा माग काढत उपनिरीक्षक धनाजी टोणे यांच्यासोबत नाशिक गाठले. तेथून कृष्णा शिंदे याला ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, गुन्हे निरीक्षक गोविंद जाधव, दया शेगर, सुजाता फुलसुंदर यांच्या पथकाने केली.

Web Title: video was taken of the woman, threatening and demanding sexual pleasure

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here