पराभवाचा धसका? रात्रीच्या अंधारात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट
Vidhansabha Election 2024: रात्रीच्या अंधारात राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर.
जालना: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे. तर त्यांच्या आधी रात्रीच्या अंधारात राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शक्यतो रात्रीच्या वेळी अनेक नेते अंतरवाली सराटीत येऊन भेट घेत आहेत.
राजेश टोपे यांच्या आधी रात्रीच्या अंधारात राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी भेट घेत आहेत. काल रात्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या आठ दिवसात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी शक्यतो रात्रीची वेळ निवडत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जरांगेंना भेटण्यासाठी रात्री पावणे दोन वाजताची वेळ घेतली होती. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे. रात्री पावणे तीन वाजता राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बैठक झाली. अंतरवाली सराटीत ही बैठक पार पडली. यावेळी राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी अनेक नेते हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.
Web Title: Vidhansabha Election Radhakrishna Vikhe Patil met Manoj Jarange Patil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study