ईव्हीएमवर खापर न फोडता विखेंनी पराभव मान्य करावा : नीलेश लंके
Breaking News | Ahmednagar: खासदार सुजय विखे पाटील हे त्यांच्या कर्तृत्वामुळे लोकसभा निवडणुकीत पराभूत.
पारनेर: भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे त्यांच्या कर्तृत्वामुळे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी ईव्हीएमवर खापर न फोडता पराभव मान्य करावा. जसा विजयाचा आनंद पचविता आला पाहिजे तसाच पराभवही पचविता आला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार नीलेश लंके यांनी विखे यांच्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर व्यक्त केली.
हंगा (ता. पारनेर) येथे गुरुवारी लंके यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी लंके यांना डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीबाबत विचारले होते. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार लंके म्हणाले, कालच समजले की, माझ्या सभांच्या व्हिडीओ चित्रीकरणाची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तुम्ही पराभव मान्य करायला शिका. समाजापुढे जाताना सांगू शकत नाहीत की माझ्या कर्तृत्वामुळे पराभूत झालो. आता ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचे सांगून समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. व्हीव्हीपॅटमध्ये घोटाळा झाला, अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही, हे करण्यापेक्षा त्यांनी पराभव मान्य करायला शिकले पाहिजे, असा सल्ला लंके यांनी यावेळी विखे यांना दिला.
देशात, राज्यात आजवर अशा प्रकारचे आरोप झाले आहेत. सत्तेत असलेल्या पक्षाचा पराभूत उमेदवार अशी तक्रार करीत असेल तर त्याचा आक्षेप सरकारवरही आहे, असेच म्हणावे लागेल. त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेण्यासारखा हा प्रकार असल्याचे लंके यांनी सांगितले.
Web Title: Vikhs should accept defeat without bothering about EVMs
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study