Akole: अकोले तालुक्यात या गावांत करोना बाधितांची भर
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११ जण नवीन बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३४६० वर पोहोचली आहे.
शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कळस येथील २३ वर्षीय महिला, पिंपळदरी येथील ४७ वर्षीय महिला, धामणगाव रोड येथे ४० वर्षीय महिला, हिवरगाव येथे ५५ वर्षीय पुरुष, अंभोळ येथे ३९,३२ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, कॉलेज रोड अकोले येथे २० वर्षीय पुरुष, कळंब येथे ५३,३३ वर्षीय महिला, टाहाकारी येथे ५० वर्षीय पुरुष, असे ११ जण बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ४४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शनिवारी ६४३ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या ३ हजार ३१४ इतकी झाली आहे. वाढती रुग्णसंख्या प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे.
Web Title: Village in Akole taluka there is an influx of Corona