Home Crime News Sunil Deore हत्येप्रकरणी गावकरी संतापले; रस्ता रोको करून जाळले टायर

Sunil Deore हत्येप्रकरणी गावकरी संतापले; रस्ता रोको करून जाळले टायर

Sunil Deore

Sunil Deore : यवतमाळ बाजार समिती संचालक शिवसेनेचे सुनील डिवरे यांच्या हत्येनंतर भांब राजा गाव आणि परिसरातील लोक चांगलेच संतप्त झाले आहेत. नागपूर-तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको करीत टायरची जाळपोळ केली. सर्व आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. काल रात्री सुनील डिवरे यांची काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

माजी मंत्री आमदार संजय राठोड शवविच्छेदन गृहाजवळ दाखल झाले होते. त्यांनी सुनील डिवरे यांच्या कुटुंबियांशी यावेळी बातचित केली. मुख्य आरोपीला अटक करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ज्याने हत्येचा कट रचला त्याला अटक व्हावी या मागणीसाठी गावकरी संपत्प झाले आहेत. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका काल सायंकाळी 7.30 च्या सुमारास घेण्यात आली होती.

सुनील डिवरे हे त्यांच्या घरी असताना त्यांच्यावर घरासमोर अचानकपणे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात सुनील डिवरे यांच्या छातीत आणि पोटांत दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. सुनील डिवरे यांच्या डोक्यावर आणि हातावर सुध्दा धारदार शस्त्राने वार करण्यात आले असल्याचे समजते. या हल्ल्यात डिवरे यांचा मृत्यू झाला. भांब राजा गावातील या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.

Web Title : Villagers angry over Sunil Deore murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here