Home महाराष्ट्र भटक्या कुत्र्याने घेतला ‘वाघ-बकरी चहा’ मालकाचा जीव, 49 व्या वर्षी निधन

भटक्या कुत्र्याने घेतला ‘वाघ-बकरी चहा’ मालकाचा जीव, 49 व्या वर्षी निधन

Wagh Bakri Tea Parag Desai Passes away: वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे निधन.

Wagh Bakri Tea Parag Desai Passes away

Parag Desai: वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ४९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते अनेक दिवसांपासून व्हेटिंलेटरवर होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील आठवड्यात मॉर्निंक वॉकसाठी जात असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता. मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. स्वतःचा बचाव करत असताना ते घरासमोरच पाय घसरून खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे घोषित केले होते. मात्र, त्यांचा प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग गेल्या एक आठवड्यापासून रुग्णालयात होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पराग देसाई हे वाघ बकरी चहा कंपनीच्या 6 ग्रुप ऑफ डायरेक्टरपैकी एक होते. ते कंपनीक एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. त्यांनी अमेरिकेतील लाँग आयडँड युनिव्हर्सटीतून एमबीए केले होते. वाघ बकरी कंपनीसाठी त्यांनी मार्केटिंग, सेल्स आणि एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ते टी एक्सपर्टदेखील होते.

 Web Title: Wagh Bakri Tea Parag Desai Passes away

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here