Home Maharashtra News Waris Pathan : अज्ञात तरुणाने फासलं तोंडाला काळ

Waris Pathan : अज्ञात तरुणाने फासलं तोंडाला काळ

Waris Pathan

Waris Pathan : मध्यप्रदेशच्या इंदोर शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. एमआयएमचे (AIMIM) महाराष्ट्रातील मोठे नेते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात तरुणाने काळं फासलं आहे. आज इंदूर येथील खजराना दर्ग्यात चादर चढविण्यासाठी ते गेले होते. या दरम्यान त्यांच्या पाठीमागून एक तरुण येत त्याने वारीस यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं. काही कळायच्या आतच तो तिथून पळूनही गेला. या घटनेनंतर एमआयएमचे कार्यकर्ते घटनास्थळी आक्रमक झाले होते.

वारीस पठाण यांनी खजराना दर्ग्यात चादर चढवली. यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत होता. चादर चढविल्यानंतर वारीस पठाण तिथून बाहेर आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी वारीस यांच्याभोवती फोटो काढण्यासाठी गलका केला. अनेक जण फोटो काढण्यात व्यस्त होते. तर काहीजण वारीस यांना बुफे देण्यात गर्क होते. यावेळी अचानक आलेल्या एका तरुणाने वारीस यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आणि तिथून पोबारा केला. घटनास्थळी असलेल्या कार्यकर्त्यांनी पकडा पकडा अशी आरडाओरड केली. मात्र काळं फासणारा तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरला.

Web Title : Waris Pathan : An unidentified young man snatched his mouth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here