Home अकोले निळवंडे धरणातील पाणी साठा पोहोचला इतक्या टक्क्यावर

निळवंडे धरणातील पाणी साठा पोहोचला इतक्या टक्क्यावर

Nilwande Dam:  पावसाचा जोर ओसरला असलातरी धिम्यागतीने पाण्याची आवक होत असल्याने निळवंडेतील पाणीसाठा 93 टक्क्यांवर पोहचला.

water storage in Nilwande Dam has reached this percentage

भंडारदरा: उत्तर नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण १०० टक्के भरले आहे.  पाणलोटात बुधवारी पावसाचा जोर ओसरला असलातरी धिम्यागतीने पाण्याची आवक होत असल्याने निळवंडेतील पाणीसाठा 93 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान उजनी धरण ६४ टक्के तर जायकवाडी धरण ५० टक्के भरले आहे.

गत चार दिवसांपासून घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पाऊस होत असल्याने तुडूंब असलेल्या भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक झाली. हे सर्व पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. ते निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा वाढत गेला. काल सायंकाळी पाणीसाठा 7745 दलघफू (93 टक्के) झाला होता. पाऊस ओसरल्याने पाण्याची आवक मंदावली आहे.

भंडारदरातून 1429 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. भंडारदरात काल दिवसभर पडलेल्या पावसाचा केवळ 7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाकी तलावातून सोडण्यात येणारा ओव्हरफ्लो बंद करण्यात आला आहे.

Web Title: water storage in Nilwande Dam has reached this percentage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here