राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस, नगर, पुणेसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
Weather Update: 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार.
पुणे: ताशी किमान 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे, जोरदार मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील तीन दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणेसह कोकणातील सिंधुदुर्ग, विदर्भातील सर्वच जिल्हे आणि मराठवाड्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, वाशिम, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Web Title: Weather Update Heavy rain for the next three days in the state, yellow alert
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App