राज्यातील तापमानाचा पारा घसरला; ‘या’ तारखेपासून थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा..
Weather Update: राज्यात किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली, काल अहिल्यानगरचा पारा १२.६ अंश इतका होता.
Winter Update: सध्या देशभरात हिवाळा सुरु झाला आहे. यंदा अर्धा नोव्हेंबर महिन्याना संपला तरी कडाक्याची थंडी जाणत नाहीय. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून जळगावसह महाराष्ट्रातील तापमानात घट होताना दिसत असून यामुळे थंडीची चाहूल लागू लागलीय. किमान तापमान हे ११ अंशापर्यंत घसरले असून आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान , धुळे येथे कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी ११ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानात घट होत आहे.कोकण आणि राज्याच्या दक्षिण भाग वगळता उरलेल्या राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. मुंबईतील सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे ३५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढणार असल्याचे अंदाज वर्तवला आहे.
राज्यात २१ नोव्हेंबर पासून थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून राज्यात थंडी वाढणार, हवामान शास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निवळताच उत्तर भारतात पश्चिमी चक्रावत सक्रिय झाले आहे.या भागातून महाराष्ट्रात शीतलहरी येण्यास प्रारंभ झाला आहे. काल अहिल्यानगरचा पारा १२.६ अंश इतका होता तर पुण्यात किमान १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे.
Web Title: Weather Update Severe cold wave warning from this date
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study