धरणावर फिरायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा भावांचा बुडून मृत्यू
दोन सख्खा भावांचा बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना समोर
नंदूरबार: जिल्ह्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धरणात दोन सख्खा भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यन गोरख वळवी (वय 14), प्रीतम गोरख वळवी (वय 12) असे या बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत मुलांच्या शेतालगत धरण होते. ते दोघे पोहण्यासाठी धरणात उतरले. परंतु त्यांना धरणातील खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा पाण्यात बुडून मुत्यू झाला. दोघेजण धरणात बुडाल्याची माहिती स्थानिकांना माहिती होताच त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना स्थानिकांनी पाण्यात बाहेर काढलं. त्यानंतर दोघांना उपचारासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती गावात पसरल्याने गावकऱ्यांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही सख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघे सख्ख्या भावांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वळवी परिवारातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत खांडबारा पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Went for a walk on the dam, two brothers drowned due to not predicting the water
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App