Home लाइफस्टाइल काय आहेत सोन्या चांदीचे चालू दर ? जाणून घ्या

काय आहेत सोन्या चांदीचे चालू दर ? जाणून घ्या

Gold Price Today

Gold Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये काहीशी सुधारणा होत असताना २२ कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति तोळा ४७ हजार १६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७ हजार ९० रुपये प्रति तोळ्यावर ​​बंद झाली होती. एका वेबसाइटच्या माहितीनुसार चांदी ६३ हजार २०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटच्या माहितीनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७ हजार १६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९ हजार १६० प्रति तोळा आहे. पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४६ हजार ४०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८ हजार ९२० रुपये प्रति तोळा असेल. नागपूर मध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार १६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार १६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती तोळा दर ६३२ रुपये आहे.

सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दरामध्ये कसलाही फरक नाही. हॉलमार्क सोन्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो ही बाब सामान्य ग्राहकांना माहीत असायला हवी.

Web Title : What are the current rates for gold and silver? Find out

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here