Home Maharashtra News पुढील तीन दिवस या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता: हवामान खात्याचा इशारा

पुढील तीन दिवस या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता: हवामान खात्याचा इशारा

Wheather Alert next three days rain

पुणे | Wheather Alert: राज्यात काही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर परिस्थिती अद्याप नियंत्रणात आली नाही. कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर, गडचिरोली, अकोला या भागांत चांगलाचा पाउस झाला आहे.

आता हवामान खात्याने पुढील तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रात घाट माथ्याचा परिसर, सातारा, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

तसेच २७ जुलैपर्यंत मराठवाड्याच्या औरंगाबाद, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर उस्मानाबाद या ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाउस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.

Web Title: Wheather Alert next three days rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here