Home महाराष्ट्र राज्यात कधी पडणार मोठा पाऊस? पंजाबराव डखांनी सांगितली तारीख

राज्यात कधी पडणार मोठा पाऊस? पंजाबराव डखांनी सांगितली तारीख

Maharashtra Rain Update : पावसाबाबत पंजाबराव डखांनी महत्वाचा अंदाज.

When will it rain heavily in the state Date given by Panjabrao Dakh

Panjabrao dakh: सध्या राज्यात कुठं जोरदार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणीच मोठा पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पावसाबाबत पंजाबराव डखांनी महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 23 तारखेपासून राज्यात मोठा पाऊस होणार असल्याचा इशारा पंजाबराव डखांनी दिला आहे.

पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 22 जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. यानंतर मात्र परिस्थिती बदलणार आहे 23 जून नंतर महाराष्ट्रात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे. 23 जून ते 25 जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.

दरम्यान, 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एवढेच नाही तर त्यांनी जुलै महिन्यात 10 ते 15 जुलै या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 19, 20 आणि 25, 26 जुलै दरम्यानही चांगला पाऊस पडणार असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: When will it rain heavily in the state Date given by Panjabrao Dakh

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here