Home महाराष्ट्र लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात केले जाहीर

लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात केले जाहीर

Ladki Bahin Yojana Update: “कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये. आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही.

When will the December installment of Ladki Bahin Yojana be received, the Chief Minister announced

CM Devendra Fadnavis : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत भाषण करत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर करत नवीन कोणतेही निकष न लावता ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत, अशी माहिती दिली. तसंच या योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता हे अधिवेशन संपताच जमा केला जाईल, असंही सांगितलं आहे. सभागृहात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये. आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवलं, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेला नवीन निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाईल, असा आरोप सरकारवर केला जात होता. हा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोडून काढला आहे. “या योजनेसाठी नवीन कोणतेही निकष लावलेले नाहीत. फक्त काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं लक्षात येत आहे. काहींनी चार-चार बँक खाती तयार करून फायदा घेतला आहे. समाजात जसे चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात, तसे काही वाईट प्रवृत्तीचेही लोक असतात. त्यामुळे अशा लोकांनी फायदा घेऊ नये याची आम्ही काळजी घेऊ. कारण हा जनतेचा पैसा आहे. मागच्या काळात आमच्या लक्षात आलं की, पुरुषानेच नऊ खाती काढून लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला. आता या पुरुषाला लाडकी बहीण म्हणायचं कसं? लाडका भाऊदेखील म्हणून शकत नाही. कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारणारा भाऊ लाडका असू शकत नाही,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. दरम्यान, “महायुतीने शेतकरी, युवा, ज्येष्ठ, समाजातील वंचितांच्या संदर्भातील दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजघटकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: When will the December installment of Ladki Bahin Yojana be received, the Chief Minister announced

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here