अकॅडमीत जातांना युवतीला लॉजवर नेऊन अत्याचार
Breaking News | Satara Crime: १७ वर्षांच्या युवतीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार.
सातारा : भरतीपुर्व अकॅडमीत जाण्यासाठी दुचाकीवरून सोडतो, असे म्हणून १७ वर्षांच्या युवतीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यातून पीडित युवती गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात अहमदनगरमधील एका तरुणावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित सुखदेव वाघमारे (वय २३, रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती माण तालुक्यातील एका पोलिस अकॅडमीत काही महिन्यांपूर्वी जात होती. त्यावेळी संशयिताने तिला दुचाकीवरून सोडतो, असे म्हणून एका लॉजवर नेले. त्याठिकाणी त्याने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित युवती सुटीसाठी तिच्या गावी जात असताना एका लॉजवर नेऊन त्याने पुन्हा अत्याचार केला. असा प्रकार वारंवार घडला. यातून पीडित युवती गर्भवती असल्याचे समोर आले. पीडित मुलीच्या आईने पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात झिरो नंबरने तक्रार दाखल केली. ही तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. त्यावरून पोलिसांनी संशयित तरुणावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: While going to the academy, the girl was taken to the lodge and abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study