Home क्राईम विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना भर रस्त्यात कुऱ्हाडीचा धाक दाखवत बलात्कार

विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना भर रस्त्यात कुऱ्हाडीचा धाक दाखवत बलात्कार

Nagpur Crime:  महाविद्यालात विद्यार्थिनी जात असताना कुऱ्हाडीचा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार (Raped) केल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे.

While going to the college, the student was raped on the road with an ax 

नागपूर: महाविद्यालात विद्यार्थिनी जात असताना कुऱ्हाडीचा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जामठा स्टेडियम परिसराजवळील जंगलात भरदिवसा ही घटना घडली. या तरूणीवर लैंगिक अत्याचार करून तिला गंभीर दुखापत करून आरोपी तेथून पसार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी ही या परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती मूळ वर्ध्याची रहिवासी आहे. ती तिच्या गावाहून एसटीने आली. वर्धा-नागपूर महामार्गावरील एका बस थांब्याजवळ तिची बस थांबली. महाविद्यालयात जाण्यासाठी ती तेथूनच पायी निघाली. लवकर पोहोचता यावे यासाठी तिने जंगलाजवळील निर्जन रस्ता धरला. या रस्त्यावरून जात असताना ही तरुणी तिच्या मोठ्या बहिणीशी फोनवर बोलत होती. आपला कुणीतरी पाठलाग करीत असल्याचे तिच्या लक्षात आल्याचे तिने तिच्या बहिणीला सांगितले.

महाविद्यालयात पोहोचेस्तोवर माझ्याशी बोलत रहा, असेही तिने बहिणीला सांगितले. दरम्यान, निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक काळसर रंगाचा अनोखळी आरोपी अचानक तिच्यासमोर आला. त्याने त्याच्याकडील कुऱ्हाडीच्या जोरावर तिला धमकावले. तिच्याकडील फोन हिसकावला तो फेकून तिला. तिला अक्षरश: फरफटत जंगलात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीची आरोपीशी झालेली झटापट तिच्या बहिणीने फोनवर ऐकली. बहिणीने तातडीने तरुणीच्या महाविद्यालयात फोन करून ही माहिती दिली.

हा प्रकार कळल्यावर महाविद्यालयातील कर्मचारी धावत तिचा शोध घेत आले. त्यांना पाहताच आरोपी फरार झाला. त्यानंतर महाविद्यालयाने हिंगणा पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली. तिच्या पालकांनादेखील कळविण्यात आले. तरुणीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध भादंविच्या ३७६, ३४१, ५०६ (२), ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीचा शोध सुरु आहे.

Web Title: While going to the college, the student was raped on the road with an ax 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here