Home संगमनेर आमचं दुखणं सांगु कोणाला! घारगाव पोलीस स्टेशन मध्ये कर्मचारी वर्गाचा अभाव

आमचं दुखणं सांगु कोणाला! घारगाव पोलीस स्टेशन मध्ये कर्मचारी वर्गाचा अभाव

Breaking News | Sangamner : घारगाव पोलीस स्टेशन वर सध्या तोंड दाबून भुक्क्यांचा मारा सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे.मात्र पोलिस हा कामावर येन्या अगोदर कोनाचा तरी बाप, कोनाचा तरी भाऊ, कोनाचा तरी नवरा असतो हे लक्षात घेऊन त्यांच्यावर अपुऱ्या मनुष्य बळामुळे जो मानसिक ताण पडलाये तो कमी झाला पाहीजे. त्यांच्या व्यथा या कोणीतरी ऐकून घेतल्या पाहिजे घारगाव पोलीस स्टेशन हे अडगळीत असल्यामुळे त्याचा श्वास कोंडलेला आहे, पोलिस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करून नवीन इमारतीचे बांधकाम तात्काळ सुरूकरण्यात यावे हीच सर्वांची मागणी आहे. 

Who should tell our pain Lack of staff in Ghargaon Police Station

संगमनेर (आदेश वाकळे): संगमनेर तालुक्याचा पठार भाग व याच पठार भागातील घारगाव पोलिस स्टेशन हे पोलिस स्टेशन कायम चर्चेत असते मात्र सध्या हे वेगळ्याच बाबी साठी चर्चेत आले आहे.तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे दिवसेन दिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे.घारगाव पोलीस स्टेशनची स्थापना 2010 मध्ये झाली. यामधे घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 46 गावे व 51 वाड्या आहेत घारगाव पोलीस स्टेशनची भौगोलिक रचना ही काहीशी वेगळी आहे. डोंगर दऱ्याखोऱ्या,नदी, नाले, जंगल, पोलिस स्टेशन जवळुन गेलेला पुणे-नाशिक हायवे व नेहमीच या पठारात होनारे राजकीय दौरे. मात्र साधे घारगाव पोलीस स्टेशनला यायला रस्त्याची मोठी बिकट अवस्था आहे.

घारगाव पोलीस स्टेशनला 46 पोलिस कर्मचाऱ्यांचे मनुष्य बळ असणे याची तरतुद आहे. पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्या बदली नंतर आता फक्त 26 कर्मचारी व ऐका पोलिस निरीक्षकावर घारगाव पोलीस स्टेशनमध्ये  कामकाच सुरू आहे. घारगाव पोलिस स्टेशन चालवन्यासाठी रोज 22 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.  त्याच्यामध्ये 3PSI + 17 कर्मच्यारी (पोलिसांची) आवश्यकता असुन मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारांची संख्या वाढत आहे.घारगाव पोलीस स्टेशन हे मुळा नदीच्या काठावर भाडेतत्त्वाच्या बिल्डिंगमध्ये आहे.अनेक राजकीय नेत्यांनी हे पोलिस स्टेशन नवीन स्वरूपातील  इमारतीत स्थलांतरीत करू असे सांगितले मात्र तसे झालेले अजुन तरी दिसत नाही.

2010 च्या स्थापनेनंतर घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोकसंख्या झपाट्याने वाढत चालेली आहे. परिणामी जे कर्मचारी आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढताना बघायला मिळत आहे. कर्मच्याऱ्यांना सप्ताहीक सुट्टी देनेही कसरतीचे काम होऊन बसले आहे.आम्ही आमची व्यथा आता मांडु तरी कोनापुढे अशी पोलिस कर्मच्याऱ्यांमधे दबक्या आवाजात चर्चा आहे.घारगाव पोलीस स्टेशन पासून कोर्टकिलोमीटर 40 किलोमीटर तर ग्रामीण रुग्णालय सुद्धा 44 किलोमीटर (अंदाजे) अंतरावर आहे. घारगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना निवासाची सोय नाहीआरोपी ठेवण्यास कुठलीही सोय नाही घारगाव पोलीस हद्दीत मुली पळून जाण्याचे प्रमाण हे अलीकडे वाढले आहे. यामध्ये बलात्कार/पोस्को व 376 चे गुन्हे सर्वांधीक आहे. जा गुन्ह्याची नोंद झालेली आहे  तसेच कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे चोरीचे प्रमाण दिवसे गणित वाढत चालले आहे यामध्ये शेतीच्या विद्युत मोटारी,केबल ,घरफोड्या अपघात वाढत चालले आहे. जवळुनच नाशिक-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे गुन्हेगारीने डोक वर काढलेले आहे. या महामार्गावर दुसऱ्या जिल्हातुन येऊन बेवारस मृतदेह टाकले जातात व काही अपघात म्हटले तर  दिवसाला एक मयत होत आहे तसेच महामार्गावर लुटमारी सुद्धा प्रमाण वाढत चालले आहे.त्यात भर म्हनुनकी काय राष्ट्रीय महामार्ग पुणे-नाशिक वर आमदार,खासदार,मंत्री, VIP,VVIP यांच जान येन असत व ह्या ऍक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे त्यांना तात्काळ एस्कॉर्ट ची सुरक्षा घारगाव पोलीस स्टेशनला द्यावी लागत आहे.व सर्वांना परिचय असलेले राजकीय नेते हे वेळेत येतात हे तुरळकच. परिणामी  हातातले काम सोडुन कर्मच्याऱ्यांना नेते लोकांची वाट त्यांना पाहावी लागते.

विशेष म्हणजे  घारगाव पोलीस स्टेशनला होमगार्ड सुद्धा सध्या येत नाहीये. यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर  या कामाचा ताण वाढत आहे.या चौकीला महिला कर्मचाऱ्यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असताना देखील केवळ ऐक ते दोनच महिला कर्मचारी येथे कारन्वित आहेत. घारगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्रीची गस्त घालावी लागत आहे पण एक गाडी असल्यामुळे पूर्ण गस्त होत नाही. गाडीची दररोजचे रनिंग जास्त असल्यामुळे गाडीचा मोठ्या प्रमाणात मेंटेनन्स निघतो,घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्वतः गाडीचा मेंटेनन्स व खर्च करतात वेळप्रसंगी स्वतःच्या खाजगी वाहनातून गुन्हेगारांच्या तपासासाठी आपली वाहने वापरतात घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत जास्त प्रमाणात जप्त केलेले वाहन ठेवावे आलेले आहेत. ती वाहने ठेवायला सुद्धा जागा नाही घारगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना राहण्याची व मुलांच्या शाळेची सोय घारगाव परिसरात नसल्यामुळे अनेक अधिकारी हे तालुक्याच्या ठिकाणी  राहतात परिणामी नवीन पोलिस अधिकारी कामावर हजर होताना कर्मचारी टाळाटाळ करतात तसेच नवीन कर्मचारी घारगाव पोलीस स्टेशनमध्ये काम करण्यास इच्छा दाखवत नाही. कर्मचारी येण्यास मोठ्या प्रमाणात टाळाटाळ करतात.

घारगाव पोलिस स्टेशनच्या एका  कर्मचाऱ्याकडे  सध्या 40 ते 45 गुन्ह्यांची तपास देण्यात आलेला आहे. यामध्ये अपघात ,अर्ज ,मयत,छेडछाड,चोरी,धमकी,जमीनीचे वाद असे विविध तपासाचे काम दिले आहेत. त्यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणात मानसिक तणावात असल्याचे बघायला मिळत आहे.तसेच 112 नंबर वरून अनेक समाजकंटक जाणून बुजून फोन करून घारगाव पोलीस स्टेशनला त्रास देतात. घारगाव पोलीस स्टेशन मुळा नदीच्या काठावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीतून येणारे सरपटणारे प्राणी तसेच हिंसक प्राण्यांचा वापर घारगाव पोलीस स्टेशन जवळ बघायला मिळत आहे, त्यामुळे एस पी साहेब घारगाव पोलीस स्टेशन कडे लक्ष द्या अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. घारगाव पोलीस स्टेशनला 46 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आज मीतीस  केवळ 26 कर्मचारी कामावर आहेत यामध्ये 24 शिपाईची आवश्यकता असताना केवळ 12 च शिपाई आहे 3 PSI आवश्यकता असताना एकही PSI नसल्याने  घारगाव पोलीस चौकीच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसते.

2018 मध्ये घडले  गुन्हे 96

2019 मध्ये घडले  गुन्हे 243

2020 मध्ये घडले  गुन्हे 244

2021 मध्ये घडलेले गुन्हे 244

2022 मध्ये घडलेले गुन्हे 336

त्यामुळे  एकूणच घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करा आमची केस पहिली घ्या अशी मागणी फिर्यादी कडून पोलीस कर्मचाऱ्यांना होते मात्र आता अपुऱ्या फौजेवर लढायचे कसे असा  प्रश्न घारगाव पोलिसांसमोर  आहे.लवकरात लवकर येथे कर्मचाऱ्यांची नियुक्त करावी व नवीन इमारतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावुन अडगळीत पडलेल्या घारगाव पोलिस स्टेशनला नवे रूप द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

Web Title: Who should tell our pain Lack of staff in Ghargaon Police Station

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here