अक्षय शिंदेच्या थेट डोक्यात गोळी का मारली…? उच्च न्यायालयाचा थेट सवाल
Akshay Shinde Encounter Case: न्यायालयाने एन्काऊंटरच्या घटनेंवरच संशय व्यक्त केला.
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील बदलापूर एन्काऊंटरची सुनावणी सुरू असताना आज मुंबई उच्च न्यायालयाने चकमकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रथमदर्शनी, या चकमकीत काही गडबड असल्याचे दिसते. सामान्य माणूस पिस्तुलातून गोळीबार करू शकत नाही. कारण त्यासाठी ताकद लागते, असे न्यायालयाने म्हटले आहे. एक कमकुवत माणूस हे करू शकत नाही कारण रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणे सोपे काम नाही, असे निरीक्षण न्यालायालयाने नोंदवले आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, यावेळी न्यायालयाने एन्काऊंटरच्या घटनेंवरच संशय व्यक्त केला आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयाने या घटनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हा एन्काऊंटर होऊच शकत नाही. आरोपीवर गोळीबार करणे टाळता आले असते आणि पोलिसांनी त्याला आधी काबूत आणण्याचा प्रयत्न का केला नाही. तसेच आरोपीच्या पायात किंवा हाताला गोळी लावण्याऐवजी थेट डोक्यात गोळी का मारण्यात आली? आरोपीच्या मृत्यूचा तपास निःपक्षपातीपणे व्हायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
बदलापूर शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. सोमवारी संध्याकाळी पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून घेत गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या अकस्मात मृत्यूचीही नोंद केली आहे . या घटनेबाबत पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते की, सोमवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली. त्यावेळी शिंदेला त्याच्या पूर्व पत्नीने केलेल्या तक्रारीवरून दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे नेले जात होते. पण त्याचवेळी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांसोबत झालेल्या या चकमकीत अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला. शिंदे (२४) याच्यावर बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. बदलापूर येथील एका शाळेतील कंत्राटी सफाई कामगार अक्षय शिंदे याला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. पाच दिवसांपूर्वी त्याने शाळेच्या स्वच्छतागृहात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते.
Web Title: Why Akshay Shinde was shot directly in the head
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study