‘माझ्या पत्नीला व्हॉट्सअॅप मेसेज का केला? तरुणाची आत्महत्या
Breaking News | Pune Crime: ‘माझ्या पत्नीला व्हॉट्सअॅप मेसेज का केला? तुझी आता पोलीस ठाण्यात तक्रार करतो,’ अशी धमकी देत दाम्पत्याने तरुणाला तब्बल १३ लाखांना गंडा. तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या.
पुणे : ‘माझ्या पत्नीला व्हॉट्सअॅप मेसेज का केला? तुझी आता पोलीस ठाण्यात तक्रार करतो,’ अशी धमकी देत दाम्पत्याने तरुणाला तब्बल १३ लाखांना गंडा घातला. त्यानंतर त्या तरुणाच्या कार्यालयात जाऊन मानसिक त्रास देत ब्लॅकमेल केले. या त्रासाला कंटाळून तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.
मागील महिन्यात २१ फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास नारायण पेठेतील गणराज सोसायटीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी गोपाळ जोशी (वय ३३, रा. नव्हे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशोक जोशी (वय ३८, रा. नारायण पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी वैष्णवी गणेश चव्हाण (वय २६) आणि गणेश चव्हाण (वय २८, दोघेही रा. खैरेवाडी, भारती विद्यापीठ रस्ता) अशी गुन्हा दाखल केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, अशोक जोशी हे नव्हेत राहायला असताना १३ जानेवारीला त्यांनी आरोपी वैष्णवीला व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. त्यानंतर चव्हाण दाम्पत्याने संगनमत करून अशोकला गाठले. त्याला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊन पैसे उकळण्यास सुरुवात केली. २१ फेब्रुवारीपर्यंत चव्हाण दाम्पत्याने अशोककडून १३ लाख रुपये उकळले. त्यानंतरही पैसे मागत त्याचा मानसिक छळ केला. छळाला कंटाळून अशोकने २१ फेब्रुवारीला नारायण पेठेतील कार्यालयात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. नातेवाईक हे अशोकचा अंत्यविधी करण्यासाठी मूळ गावी गुजरातला गेले होते. त्यामुळे उशिरा तक्रार दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Why did you send a WhatsApp message to my wife? Youth suicide
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study