धक्कादायक! पत्नीसह पोटच्या मुलांना वडापावमधून दिलं विष अन…
Aurangabad Crime: पतीकडून पत्नीसह पोटच्या मुलांना वडापावमधून विष देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना. पतीवर गुन्हा दाखल. (Wife and children were given poison)
औरंगाबाद: औरंगाबाद शहरातून संतापजनक घटना समोर आली आहे. पतीकडून पत्नीसह पोटच्या मुलांना वडापावमधून विष देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात असून, या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी आता यात गुन्हा दाखल केला आहे.
वाद चक्क आपल्या पत्नी आणि मुलांच्या जीव घेण्यापर्यंत जाण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तक्रारदार महिलेचे आणि तिचे पतीचे कौटुंबिक कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच तक्रारदार महिलेचा पती शेख इसाक याने आपले नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस शेख याकूब, फुरखान यांच्या मदतीने 16 ऑगस्टच्या रात्री वडापावमध्ये विष कालवून पत्नी आणि मुलांना खाण्यासाठी दिले होते. वडापावचा वास येत असल्याचे निदर्शनास आल्यावर तक्रारदार महिलेने आणि तिच्या मुलांनी वडापाव न खाता फेकून दिले. त्यानंतर त्यात काही तरी मिसळले असल्याचे स्पष्ट झाल्याने तिने पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पती शेख इसाक, नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान यांच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार राठोड करीत आहेत.
Web Title: Wife and children were given poison from Vadapav
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App