Home अहमदनगर पत्नी व सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पत्नी व सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Ahmednagar News: पत्नी, सासू आणि इतरांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

wife and father-in-law's trouble, young man commits suicide

श्रीरामपूर : पत्नी, सासू आणि इतरांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून  याप्रकरणी शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकील पठाण असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो संजयनगर भागात राहत होता. त्याची आई जैबुन्निसा मेहबूब पठाण (वय ७०) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मुलगा अकील हा पत्नी, सासू आणि इतर कुटुंबीयांसमवेत राहत होता. मात्र, किरकोळ कारणावरून त्याला पत्नी व इतर त्रास देत होते. मारहाण केली जात होती. २४ फेब्रुवारीला रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान अकील याची पत्नी समीरा व सासू यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे कंटाळून अकील हा घरातील खोलीमध्ये गेला व त्याने दरवाजा लावून घेतला. त्याने घरातील फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. माजी नगरसेवक राजेंद्र पवार, सनी खांदे, सूरज सोनवणे यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. अकील याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी समीरा पठाण, आरिफा सय्यद, समीर शेख, शहारूख सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: wife and father-in-law’s trouble, young man commits suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here