Home औरंगाबाद बायकोने नवऱ्याला मैत्रिणीसोबत रंगेहाथ पकडलं, गेटला बांधून महिलेला मारहाण

बायकोने नवऱ्याला मैत्रिणीसोबत रंगेहाथ पकडलं, गेटला बांधून महिलेला मारहाण

Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Affair: पती त्याच्या मैत्रिणीसोबत स्वतःच्याच घरात रोमान्स करत.

wife caught the husband red-handed with her friend, tied her to the gate and beat the woman

छत्रपती संभाजीनगर : वाद झाल्यामुळे पतीने पत्नीला मारहाण केली आणि पत्नीला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर पती त्याच्या मैत्रिणीसोबत स्वतःच्याच घरात रोमान्स करत होता. यावेळी पत्नीने पती आणि त्याच्या मैत्रिणीला रंगेहाथ पकडलं. यावेळी संतापलेल्या पत्नीने पतीसोबत रोमान्स करणाऱ्या महिलेला घराच्या गेटला बांधून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरेश (नाव बदलले आहे) हा पत्नी व दोन मुलांसह वाळूज परिसरामध्ये राहतो. सुरेश हा वाळूज परिसरातील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. याच दरम्यान सुरेश याची सुनिता (नाव बदलले आहे) या महिलेच्या सोबत ओळख झाली.

यावरून सुरेश व त्यांच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या दोघांमधील वाद विकोपाला पोहोचला. सुरेशने पत्नीला व मुलांना घराबाहेर काढून दिले. यामुळे एक मुलगा पुण्याला तर दुसरा मुलगा हैदराबादला राहू लागला. पत्नी माहेरी निघून गेली.

दरम्यान एकटा राहत असलेल्या सुरेश याने स्वतःच्या घरी नुकतीच ओळख झालेल्या महिलेला बोलावले होते. याच वेळी त्याची पत्नी भावाला भेटण्यासाठी वाळूज परिसरामध्ये आली होती. तिने भावासोबत घरी जाण्याचा निर्णय घेतला. तिने घरी जाऊन बघितले असता पती महिलेसोबत रोमान्स करताना आढळून आला.

यावेळी संतप्त महिलेने पती व महिलेला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर संबंधित महिलेला घराच्या गेटला बांधून ठेवले. दरम्यान अचानक घडलेल्या संपूर्ण घटनेमुळे परिसरात गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.

Web Title: wife caught the husband red-handed with her friend, tied her to the gate and beat the woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here