संगमनेर: सासऱ्याच्या डोक्याला कट्टा लावत पत्नीला पळवून नेले
Sangamner Crime: जावयाने रस्त्यात गाडी आडवून फिर्यादी व त्याच्या मुलीला मारहाण करत, डोक्याला कट्टा लावत पळवून नेले.
संगमनेर: पती पत्नीच्या पती-पत्नीच्या कौटुंबीक वादानंतर पत्नी माहेरी राहत होती. त्याचबरोबर त्यांचा वाद न्यायालयात प्रलंबीत होता. अशा परिस्थितीत फिर्यादीच्या जावयाने रस्त्यात गाडी आडवून फिर्यादी व त्याच्या मुलीला मारहाण करत, डोक्याला कट्टा लावत पळवून नेल्याची घटना शनिवारी २९ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास डेरेवाडा फाटा ते धांदरफळ बुद्रुक येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र वाकचौरे (रा. धांदरफळ बु. ता. संगमनेर) यांच्या मुलीचा व तीच्या पतीमध्ये कौटुंबीक बाद असल्याने मुलगी वडिलांकडे माहेरी राहात होते. वादाचा खटला न्यायालयात प्रलंबीत होता. शनिवार २९ ऑक्टोबर रोजी फिर्यादी व त्यांची मुलगी काम आटपून दुचाकीवरून घरी जात असताना डेरेवाडी फाट्याच्या पुढे फिर्यादीच्या मुलीचा पती शुभम आनंदा कोल्हे, त्याचा भाऊ ऋतीक आनंदा कोल्हे, सासरा आनंदा महादू कोल्हे. तीची सासू व इतर लोकांनी फिर्यादी व त्याच्या मुलीस रस्त्यात अडवून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र वाकचौरे हे आपल्या मुलीला वाचवत आपल्या मुलीला वाचवत असतांना आरोपींनी मुलीला बोलोरो जीपमध्ये घालून पळून नेले. दरम्यान या मारहाणीत आरोपींनी गावठी कझ (बंदूक) चा वापर केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. मात्र तालुका पोलीसांनी याची कुठलीही नोंद घेतली नाही. या आरोपींवर गुन्हा रजि नं. भादंवि कलम ३६६ / २०२३ ३४१, ३६३. ३२३, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: wife was abducted by putting a noose on the father-in-law’s head
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App