Breaking News | Pune Crime: विद्यार्थ्याच्या शाळेच्या बसमधून ने आण करणाऱ्या एका बस चालकाने विद्यार्थ्याच्या आईवरच लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शिरूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या बसमधून ने आण करणाऱ्या एका बस चालकाने विद्यार्थ्याच्या आईवरच लग्नाच्या आमिषाने अत्याचार केला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रीकांत मिनानाथ जगदाळे (रा. करडे ता. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस शिपाई प्रतीक जगताप हे करीत आहेत.
शिक्रापूर येथील एका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमधून ने आण करीत असताना श्रीकांत जगदाळे याची मुलाच्या आईसोबत ओळख झालेली होती. त्यांची मैत्री झाली. दरम्यान, महिलेचे तिच्या पती सोबत वाद होत असल्याने श्रीकांतने तिच्याशी जवळीक वाढवली. त्यांनतर मी तुझ्याशी लग्न करतो, तू तुझ्या पतीला सोडून दे, असे म्हणून वेळोवेळी महिलेवर अत्याचार केला.
महिलेने पतीसोबत विभक्त राहणे सुरु केले. मात्र, श्रीकांत हा महिलेशी लग्न करण्यास टाळाटाळ करीत वारंवार महिलेवर अत्याचार करीत राहिला. या कालावधीत महिला गरोदर राहिली, परंतु त्यांनतर देखील श्रीकांत महिलेशी लग्न करण्यास नकार देत राहिला. महिलेची प्रसूती झाल्यानंतर श्रीकांतने स्वतंत्र खोली घेऊन महिलेले तेथे ठेवले.
मात्र, महिलेला भेटणे तसेच लग्न करण्याबाबत टाळाटाळ करु लागला. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
Web Title: Woman assaulted by school bus driver
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study