Home पुणे सोयाबीन भरडताना मशीनमध्ये पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू

सोयाबीन भरडताना मशीनमध्ये पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू

Pune Accident: सोयाबीन भरडताना सोयाबीन भरडी मशिनच्या एक्सेलमध्ये महिलेची साडी अडकल्याने झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू.

woman died as a layer got stuck in the machine while filling soybeans

भोर (पुणे) : प्रतिनिधी भोर-वेल्हा तालुक्याच्या हद्दीवरील कुसगाव (ता. भोर) येथे सोयाबीन भरडताना सोयाबीन भरडी मशिनच्या एक्सेलमध्ये महिलेची साडी अडकल्याने झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना बुधवारी (दि. २३) घडली. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रंजना दत्तात्रय गोरे (वय ३५, रा. कुसगाव, गोरेवस्ती, ता. भोर) असे मृत महिलेचे नाव आहे. रंजना गोरे या घरासमोर सोयाबीन भरण्याकरिता गेल्या असताना सोयाबीन मशिन चालू झाल्यानंतर रंजना यांचा साडीचा पदर भरडी मशिनमध्ये गुंतला. या वेळी रंजना या भरडी मशिनमध्ये ओढल्या गेल्या. यामध्ये त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. स्थानिकांनी तत्काळ जखमी अवस्थेतील रंजना यांना मशिनमधून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रंजना गोरे यांना मृत झाल्याचे घोषित केले. पुढील तपास राजगड (शिंदेवाडी) पोलीस करीत आहेत.

Web Title: woman died as a layer got stuck in the machine while filling soybeans

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here