अहमदनगर: नदीच्या पाण्यात पडून महिलेचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू.
कर्जत: कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी परिसरातील नांदणी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
बिजाबाई लक्ष्मण जमदाडे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अचानक तोल जाऊन पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
Web Title: Woman dies after falling into river water
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study