Home Breaking News बंदुकीचा धाक दाखवत महिलेला तिचे कपडे काढायला लावले अन…

बंदुकीचा धाक दाखवत महिलेला तिचे कपडे काढायला लावले अन…

Breaking News | Mumbai Crime: एका ५१ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवत तिचा लैंगिक छळ आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली.

Woman forced to remove her clothes at gunpoint

मुंबईतील खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका ५१ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवत तिचा लैंगिक छळ आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिचा विनयभंग झाल्याची तक्रार तिने पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि संस्थापक सदस्य जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की,  पीडित महिलेला आरोपींनी कंपनीच्या कार्यालयात बोलावले होते. यानंतर मुख्य आरोपी जॉय जॉन पास्कल पोस्ट याने बंदुकीचा धाक दाखवत त्या महिलेला तिचे कपडे काढायला लावले. यानंतर आरोपींनी महिलेसोबत अश्लील चाळे केले, तसेच तिला शिवीगाळ केली. यानंतर तिला शारीरिक त्रास दिला.

एवढंच नव्हे तर आरोपींनी महिलेचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो बनवले. त्यानंतर तिला हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच या घटनेबद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या महिलेने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. या संपूर्ण घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्ह्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींवर कठोर कलम लावली आहेत.

Breaking News: Woman forced to remove her clothes at gunpoint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here