संगमनेर: बसखाली सापडून महिलेचा मृत्यू, संगमनेर बस स्थानकात घडली घटना
Breaking News | Sangamner Accident: संगमनेर बसस्थानकावरील प्लॅटफार्मवर बस लावत असताना पुढील टायरखाली सापडून जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर बसस्थानकावरील प्लॅटफार्मवर बस लावत असताना पुढील टायरखाली सापडून वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
सखुबाई महादू चव्हाण (वय ८४ रा आश्वी खुर्द) असे मृत महीलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहित अशी की, नाशिक-पारनेर बस (क्रमांक एम. एच. ११ बी. एल. ९४०९) नाशिकहून संगमनेर बसस्थानकावर आली होती. याचवेळी सखुबाई चव्हाण ही जेष्ठ महीला आपल्या मुलीबरोबर बसस्थानकावर चालली होती. याच दरम्यान बसचालक प्लॅटफार्मवर प्रवाशांची चढ उतार करण्याकरिता बस लावत असतांना अचानक ती पुढील बाजुच्या टायर खाली सापडली. यात टायर महिलेच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. काही कळायच्या आतच हा अपघात घडल्याने महीलेचे दोन्ही पाय निकामी झाले. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे काही नागरिक, प्रवाशी मदतीसाठी धावले.
तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहीकेतुन महिलेला प्रथम नवीन नगररोडवरील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तीला लोणी येथे नेण्याचा सल्ला दिला. जखमी महीलेला लोणी येथील रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती आगार प्रमुख गुंड यांनी दिली. बस चालक स्वतः हून पोलीस ठाण्यात हजर झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Woman found dead under bus
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study